क्षणभरच थांब ना .......
अजुनही कंठ दाटलेला
स्वर ही आज हळवा
अश्रुंचे मेघ दाटलेले
क्षणभरच थांब ना.......
राहुनच गेले प्रेम सांगायचे
अजुन ओठांत शब्द लपलेले
ह्दयांत प्रेम उसळलेले
क्षणभरच थांब ना.......
नजरेस तहान तुझी
काळजात काळजी आली दाटुनी
ह्दयांस आस वेडी
अंतरी आर्तता ओढी
💔💔